आज दिनांक ११ मार्च २०२४
रोजी कोलते पाटील - लिटिल अर्थ, येथे डॉ. निकाळजे
हेल्थकेअर फाऊंडेशनतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, सेफ्टी
मॅनेजर गणेश परदेशी यांनी
पुढाकार घेतला आणि शिबिर यशस्वी
झाले , तसेच पुनावळे मल्टिस्पेशालिटी
हॉस्पिटलचे सीईओ विशाल निकाळजे
यांनी यात भाग घेऊन
प्रथमच रक्तदान केले ते म्हणाले रक्तदान ही समाजाची गरज
आहे, आणि प्रत्येकाने रक्तदान
केले पाहिजे , रक्तदान करून जीव वाचविणे
ही माणूस म्हणून आपली जबाबदारी आहे
,
अपघाताच्या
प्रसंगी आणि ऑपरेशनमध्ये आपण
असे रुग्ण पाहिले आहेत ज्यांना रक्ताची
गरज आहे , रक्तदान करून त्यांचे प्राण
वाचविणे आवश्यक आहे , एका रक्तदानामुळे तीन
जणांचे प्राण वाचू शकतात . जेव्हा
आपण रक्तदान करता तेव्हा ते
चार प्रमुख घटकांमध्ये विभागले जाते: प्लेटलेट्स, प्लाझ्मा, लाल रक्त पेशी
आणि पांढर्या रक्त पेशी. आणि
त्याहीपेक्षा आपण फक्त एका
व्यक्तीला वाचवत नाही तर एखाद्या
कुटुंबाचा जीव वाचवण्याचे कारण
असू शकतो ...
डॉ.
निकाळजे यांची हेल्थकेअर फाऊंडेशन शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण रक्षणाचे
काम करत आहे, रक्तदान
मोहिमेच्या या कार्यक्रमाद्वारे आम्ही
सर्वांना आवाहन करू इच्छितो , आमच्यात
समाजाचे भले करण्याची क्षमता
आहे आणि आपण रक्तदानाचे
कार्य करून ते करू
शकतो, प्रत्येक वेळी रक्तदान करून
3 जणांचे प्राण वाचविण्याचा मान मिळवू शकतो



.jpeg)
No comments:
Post a Comment