पुनावळे मल्टीस्पेशालिटी
हॉस्पिटल आणि डॉ. निकाळजेज हेल्थकेअर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मासुळकर सिटी
लिटल अर्थ किवळे (कोलते पाटील यांचा प्रकल्प) येथे दिनांक २४ जानेवारी २०२४ रोजी दुपारी
२.०० वाजता मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. एकूण ११९ मजुरांनी
त्यामध्ये सहभाग नोंदवून आरोग्य शिबिराचा लाभ घेतला, या शिबिराचे आयोजन श्री गणेश परदेशी
(सेफ्टी मॅनेजर) यांनी केले , मोफत आरोग्य शिबिरात रक्तदाब तपासणी , रॅंडम शुगर टेस्ट
, दंत तपासणी , सामान्य तपासणी व औषधे देण्यात आली ,
डॉक्टर राजकुमार
निकाळजे आणि डॉक्टर मोनाली निकाळजे यांच्या मार्गदर्शनानुसार या शिबिरासाठी नेमण्यात
आलेले पुनावळे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलचे कर्मचारी वर्ग, सहभागी डॉक्टर किरण निकाळजे
(जनरल डॉक्टर), डॉक्टर सृष्टी धांडे (डेंटिस्ट)
, श्री सरोज गांगुर्डे (लॅब टेक्निशियन) , श्रीमती मीना मलुले (नर्स) ,श्री विद्याधर
(फार्मासिस्ट) ,श्री संकेत (ॲम्बुलन्स ड्रायव्हर) , श्री प्रवीण पिंगळे , श्रीमती रूपा
निकाळजे ,श्री स्वप्निल निकाळजे, श्रीमती आरती व विशाल निकाळजे इत्यादी उपस्थित होते.
शिबिराला मिळालेला उत्तम प्रतिसाद पाहून लवकरच ब्लड डोनेशन कॅम्प घेण्याचे आश्वासन
श्री गणेश परदेशी यांनी यावेळी केले.
डॉक्टर निकाळजेज
हेल्थकेअर फाउंडेशन हे विविध शैक्षणिक, आरोग्य आणि पर्यावरण यासाठी कार्यरत आहे, संस्थेमार्फत
गरजूंना सवलतीच्या दरात कम्प्युटर क्लासेस , इंग्रजी बोलण्याचे क्लासेस , माफक दरात
उपचार अशा प्रकारचे कार्यक्रम चालवले जातात.



.jpeg)