सावित्रीबाई फुले मुलींसाठी शिक्षण प्रदान करण्यात अग्रेसर होत्या. त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका झाल्या आणि त्यांनी त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्यासोबत मुलींसाठी शाळा उघडली. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, समाजसुधारक आणि कवयित्री होत्या.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त ३ जानेवारीला , त्यांनी भारतीय महिलांसाठी केलेल्या कार्याचे स्मरण करताना, डॉ. निकाळजेज् हेल्थकेअर फाऊंडेशनतर्फे सावित्रीबाई फुले यांना आदरांजली वाहण्यात आली.
ज्या महिला त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून समाज/कुटुंबाच्या भल्यासाठी काम करत आहेत किंवा त्या स्त्रिया ज्या आरोग्य कर्मचारी म्हणून काम करत आहेत त्यांना, "लेक सावित्रीची" या पुरस्काराने पुरस्कृत केले, यावेळी निकाळजेज् हेल्थकेअर फाऊंडेशनचे डायरेक्टर : डॉक्टर राजकुमार निकाळजे, डॉक्टर मोनाली निकाळजे, रमेश सोनवणे, परशुदादा साबळे, इत्यादी उपस्थित होते.








